भारतीय संविधान निर्मिती आणि समित्या | The Constitution of India? | for MPSC | UPSC

घटना निर्मिति


  • स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली. 


    सर्वप्रथम मागणी म. गांधींजीनी ' संविधान सभा " असा उल्लेख न करता केला. इ.स १९२२ मध्ये.
    सर्वप्रथम कल्पना - मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली .
    सर्वप्रथम औपचारिक मागणी संविधान सभेची (भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केली. पाटना येथील अधिवेशनात इ.स. १९३४ मध्ये.
    स्वतंत्र भारताची राज्यघटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी - असे प. नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने इ.स. १९४० मध्ये सांगितले
    सर स्टफर्ड क्रप्स - १९४२ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे भारताची घटना पूर्णतः: भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व मान्य करण्यात आले.
    शेवटी. मे १९४६, मध्ये ' कॅबिनेट मिशन प्लॅन ' मध्ये संविधान सभेची तरतूद करण्यात आली. त्यालाच त्रिमंत्री योजना असे ही म्हणतात
  1. संविधान  सभेची रचना
  2. तरतूद 
    कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार 
  3. (त्रिमंत्री योजना )
  4. सदस्य  (३८९)
  5. ब्रिटिश प्रांत (२९२)
  6. चीफ कमिशनर (४) -> दिल्ली, अजमेर-मारवाड,कूर्ग, बलुचिस्तान 
  7. भारतीय संस्थानिक (९३)- संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय 

लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे :-

  1. सदस्यांच्या निवडनुका अप्रत्यक्षपणे " एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाच्या पद्धतीने केल्या जातील .
  2. साधारणतः १० लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असे प्रमाण ठरविण्यात आले.
  3. सर्व समुदायांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी जागांचे विभाजन तीन गटामध्ये केले.( शीख, मुस्लिम व साधारण )
  4. काँग्रेस -२०८ जागा, मुस्लिम लीग ७३ जागा , आणि उर्वरित १५ जागांमध्ये इतर गट.
  5. आठ जागा अपक्षांना मिळाल्या.
  6. एकूण जांगांपैकी १५ जागा महिलांना मिळाल्या.
  7. महात्मा गांधी व मुहम्मद अली जीना वगळता तत्कालीन भारतातील जवळजवळ सर्व संविधान सभेचे सदस्य होते.
  •  संविधान सभेचे कामकाज :- 


I ) पहिली बैठक - ९ डिसेंबर, १९४६ :-

हजर सदस्य :- २४१ 
मुस्लिम लीग गैरहजर ( पाकिस्तानची मागणी )
तात्पुरते अध्यक्ष :- डॉ. सच्चीदानंद सिन्हा (९ डिसेंबर, १९४६ 

II ) दुसरी बैठक - अध्यक्ष कायमस्वरूपी :- डॉ. राजेंद्र प्रसाद ( ११ डिसेंबर १९४६ )
उपाध्यक्ष :- H. C. मुखर्जी
सल्लागार :- सर बी. एन. राव (११ डिसेंबर १९४६) 
III) १३ डिसेंबर. १९४६ रोजी जवाहर लाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका मांडली . 
IV ) २२  जानेवारी, १९४७ रोजी संविधान सभेने 'उद्देश पत्रिका ; स्वीकार केली. ( २२ जानेवारी, १९



संविधान सभेच्या समित्या :

मसुदा समिती ---------------------> डॉ.   बाबासाहेब आंबेडकर 
संघराज्य अधिकार समिती -------->प.  जवाहर नेहरू  
प्रांतिक घटना समिती ---------------> सरदार वल्लभाई पटेल 
मूलभूत हक्क उपसमिती ------------> जे. बी. कृपलानी 
अल्पसंख्यांक उपसमिती ------------> एच. सी. मुखर्जी 
सुकाणू समिती  ------------------------> डॉ. के. एम. मुन्शी 
 
मसुदा समिती (Drafting Committee )

स्थापन :
२९ ऑगस्ट , १९४७

अध्यक्ष
: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सदस्य :

  1. डॉ. के. एम. मुन्शी
  2. एन. गोपाळस्वानी अय्यंगार
  3. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर
  4. सईद अहमद सादुल्लाह
  5. एन. माधवराव ( अगोदर बी. एल मित्तर होते )
  6. टी. टी. कृष्णमाचारी ( अगोदर १९४८ डी . पी खेतान होते )

भारतीय जनतेला मसुद्यात सुधारणा सुचविण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला.

मसुदा सादर करण्याचा दिनांक : २४ ऑक्टोबर १९४८ हा होता.

डॉ. आंबेडकरांनी ४ नोव्हेंबर, १९४८ रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला.

मसूद्याचे ३ वेळा वाचन व चर्चा झाल्यानंतर २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकृत करण्यात आला.

मूळ राज्यघटनेत प्रास्ताविका. २२ भाग, ३९५ कलमे व ८ अनु सूचीचासमावेश करण्यात आला .

Post a Comment

0 Comments