चालू घडामोडी प्रश्नोत्तरे :-
प्रश्न १ ला. उत्तर :- A ) अ -II ,ब-IV, क-I, ड -III
प्रश्न २ रा. उत्तर :- C ) अ ,ब ,क आणि ड
प्रश्न ३ रा . उत्तर :- D ) जागतिक परिचारिका दिन
प्रश्न ४ था उत्तर :- D ) ब ,क आणि ड
प्रश्न ५ वा. उत्तर :- A ) ११ मे
चालू घडामोडी प्रश्नोत्तरे आणि स्पष्टीकरण :-
प्रश्न २ ला.
उत्तर :- C ) अ ,ब ,क आणि ड
स्पष्टीकरण :- केंब्रिज क्राइस्ट कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी
केंब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर आणि पीएचडी देखील केले.
लोकशाही आणि भारत आणि युरोपचा विकास, रशिया-भारत कनेक्टिव्हिटी आणि समकालीन जागतिक राजकारण हे
त्यांच्या संशोधनाचा विषय होते. परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर देशाची निवड
प्रसिद्ध हरिशंकर यांनी केली.
कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या जामिया इस्लामिया, मौलाना अबुल कलाम आझाद इंस्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज,
दिल्ली यासह भारतातील अनेक प्रमुख आस्थापनांमध्ये त्यांनी
दीर्घकाळ शिक्षण दिले.
-----------------------------------------------------------------------------------------
प्रश्न ५ वा. उत्तर :-
A ) ११ मे
स्पष्टीकरण :- 11 मे हा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन' 11 मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी देशात तंत्रज्ञानची
क्रांती झाली. हा दिवस इतिहासात 1998 ची 'पोखरण अणु चाचणी' आणि अंतराळातील भारतातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. हा
दिवस भारताने पोखरणमध्ये केलेल्या पाच अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता. तर याच
दिवशी भारताने ऑपरेशन शक्ती या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती. अणूबॉम्बची
चाचणी करून भारताने जगात आपला दबदबा वाढवला होता. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यामुळे कधी न संपणाऱ्या पाश्चात्य
देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला भारताने आव्हान दिले.
11 मे 1998 रोजी सकाळी वाळवंटातील पोखरणमधील खेतोलाई गावाजवळ भारताने
अणुचाचणी घेतली. 58 किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित
केले. हा अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्या महायुद्धात टाकलेल्या लिटल
बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता. भारताने ही अणूचाचणी गुप्तपणे
केली होती. १९९५ मध्ये भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि
दबावाखाली भारताने त्याची चाचणी पुढे ढकलली. त्यानंतर भारताने कोणतीही कसर सोडली
नाही. कलाम आणि त्यांची टीम यांनी अनेक वेळा चाचणी स्थळाला भेट दिली. लष्करी
अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले. परंतु कोणालाही
याबद्दल माहिती मिळाली नाही आणि त्यानंतर यशस्वी अणुचाचणी झाली.
अणुचाचण्यांशिवाय भारताने बंगळूरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या हंसा 3 या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली.
०८ मे :-
आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन
११ मे :- राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
१२ मे :-आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन.
१५ मे : - भारतीय
वृक्ष दिन
-----------------------------------------------------------------------------------------
प्रश्न ३ रा . उत्तर :-
ड ) जागतिक परिचारिका दिन
स्पष्टीकरण :- दरवर्षी ६ मे १२ मे हा आठवडा संपूर्ण
जगभरात आंतरराष्ट्रीय नर्सेस आठवडा म्हणून
साजरा केला जातो. १२ मे १८२० ळ फ्लोरेन्स यांचा जन्म झाला.दिवा घेतलेली स्त्री
असंही फ्लोरेन्स यांच्या बाबतीत म्हटलं जात.
फ्लोरेन्स नाईटिंगेल यांची २०० व्या क्रमांकांची जयंती आहे.
१८५३ ते १५८६ दरम्यान चाललेल्या क्रिमिआन युद्धात जखमी सैनिकांची सेवा नाईटिंगेल यांनी
केली.
आंतरराष्ट्रीय मातृदिन : मे महिन्यातला दुसरा रविवार (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
जागतिक हास्यदिन : मे महिन्यातला पहिला रविवार
जागतिक पालक दिवस : जुलै महिन्यातील शेवटचा रविवार
-----------------------------------------------------------------------------------------
प्रश्न १ ला. उत्तर A
) अ -II
,ब-IV,
क-I,
ड -III
स्पष्टीकरण :- आसाम :- असमीया ही आसामची प्रमुख भाषा
आहे. आसामची साक्षरता ७३.१८ टक्के एवढी आहे. तांदूळ व मोहरी ही येथील प्रमुख पिके
आहेत. बिहू नृत्य येथील लोकप्रिय नृत्य आहे. दिसपूर ही आसामची राजधानी तर गुवाहाटी
सर्वात मोठे शहर आहे.
गुजरात : - सिंहाचे
शास्त्रीय नाव 'पँथेरा लिओ' आहे. शूर माणसाला सिंहाची उपमा देतात.
जगभरात आशियाई किंवा आफ्रिकन या दोन प्रकारचे सिंह आढळतात. आशियाई सिंहांचे
अस्तित्व हे पूर्वापार भारतातच राहिले असून गेल्या काही वर्षांपासून तर ते
गीरपुरतेच उरले आहे. आशियाई सिंह एकेकाळी ग्रीसपासून मध्य भारतात बिहारपर्यंत होते.
पण शिकारीमुळे ते आता फक्त गीर जंगलात मिळतात.
१) गीर
अभयारण्य - आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध अभयारण्य
२) गिरनार - जुनागढ जवळील दत्ता संप्रदायाचे महत्त्वाचे स्थान
३) द्वारका - श्रीकृष्णाच्या देवालासाठी प्रसिद्ध. बेट द्वारका हे
जवळचे ठिकाण श्री कृष्णाची राजधानी होती असे मानले जाते.
४) मोढेराचे
सूर्य मंदिर - भारतातील अतिशय दुर्मिळ असे सूर्य मंदिर.
५) राणी नी
वाव - पाटण जिल्ह्यातील पायऱ्यांची विहीर. हि युनेस्कोने
जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.
६) सोरटी
सोमनाथ - येथील शिवमंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते.
राज्यस्थान : -
राजस्थान हे भौगोलिक दृष्ट्या अतिशय वैविध्यपूर्ण आहे. थरचे वाळवंट व अरवली पर्वत
हे राजस्थानच्या भूभागाचे वैशिष्ट्य. अरवली पर्वत राज्याच्या अाग्नेय ते नैर्ऋत्य
दिशांना पसरलेला आहे व त्याची एकूण लांबी ८५० किमी इतकी आहे. अबू डोंगरावर गुरु
शिखर हे अरवली पर्वताचे राजस्थानमधील सर्वात उंच शिखर आहे. अरवलीने राजस्थानचे
पूर्व राजस्थान व पश्चिम राजस्थान असे दोन भाग केलेले आहेत.
लेह लडाख :-
फेब्रुवारी 2019 मध्ये लडाख हा जम्मू-काश्मीरमधील स्वतंत्र महसूल व प्रशासकीय
विभाग झाला, जो पूर्वी
काश्मीर विभागाचा भाग होता. एक विभाग म्हणून, लडाखला स्वतःचे विभागीय आयुक्त आणि पोलिस महानिरीक्षक म्हणून मान्यता देण्यात
आली
-----------------------------------------------------------------------------------------
प्रश्न ४ था. उत्तर :- C)
ब ,क आणि ड
स्पष्टीकरण :- देशाला पॅरालिम्पिकमधील पहिले पदक मिळवून देणारी महिला खेळाडू.
दीपा मलिक: पॅरालिम्पियन दीपा मलिकने २०१६ मध्ये रिओ पॅरालिम्पकमध्ये भारताची मान अभिमानाने
उंचावली. दीपाने गोळाफेक एफ-५३ प्रकारात रौप्य पदक पटकावले. दीपा मलिकचा
कंबरेपासूनचा भाग हा लकवाग्रस्त आहे. ट्यूमरमुळे तिच्यावर ३१ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
भारताने पॅरालिम्पिकमध्ये दुसरे सुवर्ण भालाफेकपटू देवेंद्र
झांझरियाने विश्वविक्रम रचत सुवर्ण पदकावर नाव कोरले.
-----------------------------------------------------------------------------------------
तुम्ही
तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. तुम्हाला आमची टेस्ट सिरीज कशी वाटली. आणखी काही
बद्दल हवे असेल तर खालील मेल वर send करू शकता. किंवा MPSC EXAMS HUB च्या blogs pages वर आपण आपला अभिप्राय /feedback नोंदवू शकता.
Email
ID: - anyquerysendus@gmail.com
Thank
You
0 Comments
If You Have Any Doubt, Please Let Me Know