1857 चा राष्ट्रीय उठाव व त्याची कारणे - MPSC EXAMS HUB


-:१८५७ चा राष्ट्रीय उठाव:-


अठराशे सत्तावनचा उठाव :- भारतीयांनी १८५७ मध्ये इंग्रजी सत्तेविरूद्ध केलेला उठाव. काही इतिहासकार या उठावास बंड म्हणतात, तर काही त्यास स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवितात. १८५७ च्या उठावामागे राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व लष्करी अशी अनेकविध कारणे होती. १८५७ पूर्वी  डलहौसी या गव्हर्नर जनरलने आसाम, कूर्ग, सिंध, पंजाब व ब्रह्मदेशातील पेगू हे प्रांत हस्तगत केले होते; गादीचे दत्तक वारस नामंजूर करून सातारा, झाशी, नागपूर, ओर्च्छा, जैतपूर, संबळपूर अशी संस्थाने खालसा केली; त्याच मुद्द्यावर दुसऱ्‍या बाजीरावाचा दत्तक मुलगा नानासाहेब याचा तनखा बंद केला; अव्यवस्थित कारभाराच्या निमित्ताने डलहौसीने अयोध्येचे राज्य व निजामाचा वऱ्‍हाड प्रदेश ताब्यात घेतला. त्यामुळे लहानमोठ्या सर्व संस्थानांत असंतोष निर्माण झाला होता.
संस्थाने खालसा झाल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले लोक व सैनिक बेकार झाले. १८३३ पासून १८५७ पर्यंत इंग्रजांनी साम्राज्य-विस्तारासाठी अनेक युद्धे केली.

प्रतिक्रिया :-

  1. ·         शिपायांचे बंड
  2. ·         हिंदी लोकांच्या स्वातंत्र्याचे  युद्ध
  3. ·         या उठाव नंतर हिंदुस्थानच्या इतिहासात एक नवे पर्व सुरु झाले याविषयी इतिहासकारांत एकमत आहे
  4. ·         लॉर्ड डलहौसीनंतर त्याच्या जागेवर ' हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल ' म्हणून लॉर्ड कॅनिंग याची विलायत सरकाने नेमणूक केली (१८५६ )
  5. ·          

१५८७ च्या उठावाची विविध कारणे :-

राजकीय कारणे:-

.   तैनाजी फौजेच्या पद्धतीचे दुष्परिणाम : -
  1. ·         फोडा व झोडा
  2. ·         इंग्रजांनीच त्यांच्या संरक्षणाची  बाजू स्वीकारल्याने ते आपल्या राज्यांच्या कारभाराकडे दुर्लक्ष करू लागले
  3. ·         परिणामी त्यांच्या कारभाऱयंत्रणा मोडकळीस येऊन त्यांच्या राज्यात अशांतता व अव्यवस्था निर्माण होऊ लागली

      २.   डलहौसीचे आक्रमक साम्राज्यवादी धोरण :-
  1. ·         १८४९ साली शिखांचा पराभव केला व त्यांचे राज्य जिंकले
  2. ·         १८५२ साली ब्रह्मदेशाशी युद्ध करून त्याने दक्षिण ब्रह्मदेश इंग्रज साम्राज्यात विलीन केला
  3. ·         निपुत्रिक राजेरजवाड्यांनी आपल्या वारसासाठी कंपनीची पूर्व समंती घेणे आवश्यक केले

सामाजिक कारणे :-


१. हिंदी लोकांना रानटी समजले जाई :-
२. हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना :-
३. हजारो सरंजामदार व सैनिक बेकार बनले 

धार्मिक कारणे:-


१. तिसरे संकट धर्मावर आले :-
२. समाजसुधारणावादी धोरणाची प्रतिक्रिया :-
·         सतीबंदी कायदा ,
·         बालविवाहबंदी कायदा ,
·         विधवा -विवाहसंमती कायदा ,
·         दत्तक-वारसा नामंजूर


आर्थिक कारणे:-

१. हस्तव्यवसाय व कारागिरी बुडाली :-
२. इंग्रजांनी भांडवलाकडून होणारी पिळवणूक :-
३. शेतकरी व जमीनदार यांचा असंतोष व बेकारी :-

लष्करी कारणे :-

१ हिंदी शिपायांना मिळणारी अन्यायी वागणूक :-
२. हिंदी शिपायावरील जाचक निर्बध :-
३. गोरी फौज संख्यने कमी व तीही पंजाबमध्येच :-

 तात्कालिक कारण :-

 हिंदी शिपायांना जी काडतुसे दिली जात, त्यांना गाईची व डुकरांची चरबी लावलेली असते हि बातमी १८५७ च्या उठावास कारणीभूत ठरली.

१८५७  चा उठाव अयशस्वी का झाला?

१. बंडाचा फ़ैलाव सर्व हिंदुस्थानावर झाला नाही :
२. हिंदी राजेरजवाड्यांच्या  पाठिंब्याचा अभाव :
३. बंडवाल्यांना सर्वसामान्य नेता मिळू शकला नाही :
४. सर्वसामान्य ध्येयाचा व कार्यक्रमाचा अभाव :
५. हिंदी नेते लष्करी डावपेचांत कमी पडले :
६. साधनसामग्री, अनुभव व  मनोधैर्य यात इंग्रज वरचढ :
७. उठावास जनतेचा पाठिंबा पाहिजे तसा मिळाला नाही :
८. बंडवाल्यांच्या नेत्यात दुही होती:

प्रसिद्ध इतिहासकार  थॉम्सन व गॅरेंट म्हणतात : " बंडाचा प्रारंभ तर यशस्वी झाला, पण  उत्तर हिंदुस्थानातील इंग्रजांच्या नाजूक अवस्थेचा फायदा उठविणारा एकही कार्यक्षम नेता बंडवाल्याजवळ नाही हे लवकरच स्पष्ट झाले "

१८५७ च्या उठावाचे परिणाम :

१.    कंपनीची राजवट बरखास्त झाली ( स। १८५८ चा कायदा )
द  सेक्रेटरी ऑफ स्टेट इन कौन्सिल  यांची निर्मिती
. राणीचा जाहीरनामा : राज्यकर्त्यांचे उदार धोरण :( १ नोव्हेंबर १८५८ )
. हिंदी लष्कराची पुनर्रचना करण्यात आली :
    लष्करातील इंग्रज सैनिकांचे हिंदी सैनिकांशी असणारे प्रमाण १ : २ इतके
    वाढविण्यात आले      
. संस्थानांसंबधीच्या आक्रमक धोरणाचा त्याग :
. इंग्रजांचे सामाजिक सुधारणांसंबंधीचे धोरण बदलले :
. इंग्रज राजवटीबद्दल दहशत व तिरस्कार :
. उठावापासून हिंदी लोकांनी घेतलेला धडा :
. हिंदू-मुसलमानांमधील दारी वाढत गेली :
. हिंदुस्थानचे परराष्ट्रीय  धोरण इंग्लंडशी बद्ध झाले ?
१०. इंग्रजांच्या हिंदुस्थांवरील पकड घट्ट झाली

अधिक  प्रश्नसाठी : ब्लॉगस्पॉट : https: //mpscexamshub.blogspot.com
 
टेलिग्राम चॅनेल                         @mpscexamshub

टेलिग्राम चॅनेल स्टेट बोर्ड पुस्तकासाठी : @bhalbharatiebook

Post a Comment

0 Comments