INDIAN NATIONAL CONGRESS | HISTORY |राष्ट्रीय सभेची स्थापना : (२८ डेसिबर १८८५ ) | MPSC | STI | PSI | ASO | COMBINE- 2020



राष्ट्रीयसभेची स्थापना व कार्य :- (२८ डिसेंबर १८८५ )

हिंदी राष्ट्रसभेच्या (काँग्रेसच्या ) स्थापनेची कारणे:

१. विविध धर्मसुधारणा
२. पाश्चात्य शिक्षणाचा परिणाम
३. समाजसुधारकांचे प्रयत्न :
४. वृत्तपत्रांची महत्वपूर्ण कामगिरी

       राजा राममोहन रॉय  - सवांद-कौमुदी
      देवेंद्रनाथ टांगोर - तत्वबोधिनी  
      श्री अरविंद  बाबू - वंदेमातरम
      सुरेंद्रनाथ  -    बंगाली
      लोकमान्य - ' मराठा ' ' केसरी '

     . राष्ट्रीय साहित्यांची कामगिरी :
     . हिंदुस्थानच्या प्राचीन संस्कृतीचे पाश्चात्य संशोधक व थांचे कार्य :
     . इंग्रजी भाषेचे हिंदी एकात्मतेस सहाय्य :
     . रेल्वे , तारायंत्रे , पोष्ट इत्यादी भौतिक सुधारणांचा हातभार :
     . इंग्रजांच्या अति-केंद्रिंत राज्यकारभाराचा परिणाम :
     १०. आर्थिक  शोषण करण्याचे इंग्रजांचे धोरण :
     ११. लॉर्ड लिटनची दडपशाहीची धोरणे :
     १२ . इंग्रजांचा वंश श्रेष्ठत्वाचा अहंकार व उद्दामपणा :
     १३. इलबर्ट बिलापासून मिळालेला धडा :
     १४. हिंदी सुशिक्षितांवरील अन्याय :



राष्ट्रीय सभेची स्थापना : (२८ डेसिबर १८८५ )
·        ती स्थापन करण्याच्या  कल्पनेचा मान सेवानिवृत्त इंग्रज ICS  अधिकारी अॅलन ओक्टोव्हियन ह्यूम यांच्याकडे जातो. या कामी ह्यूमला सर विल्यम वेंडरबर्न व सर हेन्री कॉटन या दुसऱ्या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांचेही  सहकार्य मिळाले.
·        १८५७ मध्ये इटवा जिल्ह्यात मॅजिस्ट्रेट असताना ह्यूमने हिंदी लोकांचे बंड जवळून पहिले होते.
 डिसेंबर १८८५ मध्ये पुण्यात कॉलऱ्याची साथ सुरु होती। म्हणून पुण्याऐवजी मुंबईत अधिवेशन घेण्याचे ठरले। त्यानुसार सर्व हिंदुस्थानातील प्रमुख नेते मुंबईस जमले। २८ डिसेंबर १८८५ रोजी राष्ट्र सभेचे पहिले अधिवेशन भरले.


अध्यक्ष :-  थोर कायदेपंडित व विचारवंत उमेशचंद्र बॅनर्जी हे होते.

१८५७ च्या उठावाचे परिणाम :

१.    याच अधिवेशनात ' हिंदी राष्ट्रसभेची ' ( इंडियन नॅशनल काँग्रेस ) स्थापना करण्यात आली.
     
३.    सर्व हिंदुस्थानातील एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनात हजर होते.
४.    त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, न्या। तेलंग, दिनशॉ वाच्छा, नरेंद्रनाथ सेन, गिरिजभूषण मुखर्जी, न्या। रानडे, डॉ। भांडारकर, आगरकर, टिळक, रंगया नायडू, जि. सुब्रह्यनय्यम, अय्यर, वीर राघवाचार्य, आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, इत्यादी हिंदी नेत्यांचा समावेश होता.



राष्ट्रीय सभेचे ध्येयधोरण :

राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी आपल्या अध्यक्षय भाषणात राष्ट्रसभेच्या प्रारंभीच्या ध्येयधोरणाची रूपरेषा सांगितली। ती पुढीलप्रमाणे :

१.    देशाच्या भिन्न भिन्न प्रदेशात राहणाऱ्यांना व देशसेवा करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यामंध्ये    
वैयक्तिक जवळीक व मैत्री निर्माण करणे ;

२.    सर्व देशप्रेमी लोकांमधील वंशभेद, पंथभेद, व प्रांतीय संकुचित भावना नाहीशी
करण्याचा प्रयत्न करणे;

३.    लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीत उदयास आलेल्या राष्ट्रऐक्यच्या भावनेची वाढ व संघटन
करणे;

४.    सध्याच्या काळातील अत्यंत महत्वाच्या सामाजिक प्रश्नावरील देशातील सुशिक्षित
वर्गाच्या मतांचा मागोवा घेणे;

५. पुढच्या वर्षीच्या काळात हिंदी नेत्यांनी हाती घ्यावयाच्या कार्यक्रमाचा विचार करणे.




टेलिग्राम चॅनेल :- @aimsstudycenter
टेलिग्राम चॅनेल स्टेट बोर्ड पुस्तकासाठी : @bhalbharatiebook


Post a Comment

0 Comments