महाराष्ट्राचे समाजसुधारक - गोपाळ गणेश आगरकर : (१४ जुलै १८५६)
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड जवळ असलेल्या टेंभू या गावी झाला.
आई :- सरस्वती
वडील :- गणेशआई :- सरस्वतीवडील :- गणेश
आई :- सरस्वती
वडील :- गणेशआई :- सरस्वतीवडील :- गणेश
शिक्षण :-
मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण - अकोला डेक्कन कॉलेज(पुणे) : बी.ए. पदवी : १८७८इ.स १८८१ मध्ये :- इतिहास तत्वज्ञान विषयात (एम. ए)
वऱ्हाड समाचार मध्ये नियमित लेख लिहून आणि शिष्यवृत्ती मिळून त्यांनी उपजीविका केली.
त्यांनी न्यू हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी सुरु केली . पुढे फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्राध्यापक झाले. खोड्याच काळात ते या कॉलेजचे प्राचार्य झाले.
सामाजिक सुधारणेचा पर्व :-
सामाजिक कार्य : आगरकर हे गरीब कुटुंबात जन्मलेले असल्यामुळे त्यांनी गरिबीची परिस्थिती अतिशय जवळून पाहिली होती. त्यांनी भरपूर शिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम करत असताना समाजसेवा ही महत्त्वाची वाटत होती.
त्यांनी एका पत्रात आईला पत्र लिहून सांगितले की आई मी चांगल्या पगाराची नोकरी सोडून मी जनहितार्थसाठी माझे जीवन घालविण्याचे ठरविले आहे. इंदौरचे संस्थानिक शिवाजीराव होळकर यांनी त्यांना मासिक ५०० रु. पगार देऊन नोकरीची संधी दिली. परंतु त्यांनी ही नोकरी देखील सोडली. आपले आयुष्य समाजसेवेमध्ये अर्पित केले.
समाजसुधारना :- समाजसुधानेसाठी आधुनिक विचारांची गरज आहे. आपल्या विचाराच्या देवाण-घेवाणसाठी व सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी आगरकरांनी केसरी आणि मराठी या वृत्तपत्रांचा आधार घेतला. त्यांनी इ.स. १८८१ मध्ये केसरी आणि मराठा ही वृत्त पत्रे सुरु केली.
त्यांनी इ.स १८८७ पर्यंत त्यांनी केसरीचे संपादन केले. कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणांत आगरकर व लोकमान्य टिळकांना १०१ दिवसांची कारावासाची शिक्षा झाली होती.
पुढे या दोघांत राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा आधी?
या कारणांमुळें मतभेद निर्माण झाले. व आगरकरांनी केशरीचा संबंध तोडला .
यानंतर त्यांनी इ.स १८८८ मध्ये स्वतःचे सुधारक हे वृत्तपत्र सुरु केले.
इ. स. १८९५ पर्यंत हे वृत्तपत्र चालले. इतर सामाजिक विरोध न डगमगता समाजसुधारणेचे कार्य सुरु ठेवले. बुद्धिप्रामाण्य,व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक समता, स्त्री-पुरुष समता, ऐहिक जीवनपद्धती व विज्ञाननिष्ठा ही त्यांची जीवनमूल्ये होती.
शैक्षणिक कार्य:- आगरकरांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी स्त्रीयांसाठी शैक्षणिक कार्य सुरु केले . सरकारी नोकरी करण्याऐवजी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. त्यांनी इ.स १८८० मध्ये मुंबई येथे विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळकांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
प्राथमिक शिक्षण हे शक्तीचे शिक्षण असावे जे पालक आपल्या मुलामुलींना प्राथमिक शिक्षण देणार नाहीत त्यांना दंड करावा. तसेच मुला-मुलींनासामान व बरोबरीने वागणूक दिली पाहिजे असे आगरकरांचे मत होते.
स्त्री शिक्षणाचा पुढाकार:- शिक्षणामध्ये जोपर्यंत स्त्रीशिक्षण घेत नाही. तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती प्रगती होणार नाही यांची जाणीव आगरकरांना होती. त्यांनी मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाला शक्ती हा सुधारक
मध्ये लेख लिहिला होता.
बुद्धिप्रामाण्यवाद :- तार्किक विचारसरणीवर आधारलेला बुद्धिप्रामाण्यवाद लोकांना समजावून सांगणे हेच आगरकरांचे ध्येय होते. कोणतेंहीगोष्ट अंधश्रद्धेने स्वीकारू नये. ती डोळसपणाने स्वीकाराली पाहिजे.
सत्य बोलणे व सत्य धरून चालणे हे महत्वाचे आहे. त्यामुळे माणसाने जे योग्य वाटेल तेच बोलावे, सांगावे व करावे असा असा आगरकरांचा उपदेश होता. व त्यांनी आपल्या जीवनामध्ये इष्ट असेल तेच बोलेले व साध्य असेल तेच करेल या कृतीचा स्वीकार केला.
व्यक्तीस्वातंत्र्य :- आगरकरांनी आपल्या जीवनामध्ये सतत व्यक्तिस्वातंत्र्याचे गुण अंगिकारले . प्रत्येक व्यक्ती हा परस्परांशी समानतेने व सहानुभूतीने वागला पाहिजे. असे त्यांचे मत होते. प्रत्येक व्यक्तीने आवश्यक असणारी बंधने सोडून स्वतंत्र्याचा घेता येईल तेवढा उपभोग घ्यावा आणि समाजहित व देशहितासाठी असावा असे आगरकरांनी प्रतिपादन केले.
हिंदू समाज आणि आगरकर यांचे विचार: -
आगरकरणाच्या मते या शिलावस्थेची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. :-
१) हिंदू लोकांचे भूगोल आणि इंतिहासाविषयीचे अज्ञान .
२) देशभक्तीचा अभाव
३) जातीभेद, अस्पृश्यता व वेगवेगळे सोहाळे .
४) पुनर्विवाहास आणि स्रियांच्या शिक्षणावरील बंदी, पडदा पद्धत व विधवांचे केशवपन
५) समुद्रपर्यटनास असलेली बंदी व विभिन्न प्रायश्चित्त
जातिभेदाला विरोध करणारे आगरकर:- आगरकरांच्या मते, जातिप्रथा या ईश्वरनिर्मित नसून त्या मानवाने स्वतः च्या स्वार्थासाठी निर्माण केलेल्या सामाजिक विषमता आहेत. जातिप्रथेमुळे शूद्र लोकांवर अन्याय होतो.
सार्वजनिक हौद व पाणवठ्यावर पाणी भरण्यास व स्नान करण्याचा सर्वांना समान अधिकार असल्याचे आगरकरांनी सांगितले. त्यांनी जातीभेद, वर्णभेद, जातिसंस्था व अस्पृश्यांतामुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले असून समाजाचा विकास खुंटलेला आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
पतीच्या निधनानंतर स्त्रीयांचे केशवपन केले जाई. ही प्रथा अमंगल,निदनीय या अन्यायी आहे असे त्यांनी सांगितले. दीनबंधू या वर्तमानपत्रात न्हावी लोकांनी विधवांचे केशवपन करू नये, असा लेख त्यांनी प्रसिद्ध केला.
जठर विवाहास त्यांनी विरोध केला . कारण ऐन तारुण्यात स्रियांना विधवा होण्याची वेळ येत होती. आणि तिला सती जावं लागे.
वी.स. खांडेकर म्हणतात की देव न मानणारा देवमाणूस होय. असे उद्गार त्यांनी आगरकाराबद्दल काढले.
अशाप्रकारे समाजसेवक , समाजसुधारक, स्त्री शिक्षणासाठी आहारात प्रयत्न करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, व्यक्तिस्वातंत्र्य, हिंदुसमाजासाठी प्रयत्न करणारे आणि इंग्रजी शिक्षणासाठी कास धरणारे महान समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल आपण या लेखात माहिती घेतली असाच नवीन लेख आपल्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत आपण आपल्या मित्रांना share करा , Follow Us करायला विसरू नका.
MPSC EXAMS HUB च्या महत्वाच्या ब्लॉगिंग आणि चालू घडामोडी -2020 विभागात आपले स्वागत आहे. या विभागात आम्ही भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय भूगोल, भारतीय राज्यघटना, सामान्य ज्ञान आणि भारतीय इतिहासासारख्या विविध स्थिर सामान्य अभ्यासाच्या विषयांवर एक महत्त्वपूर्ण ब्लॉग पोस्ट करतो. MPSC, ZP, TALATHI, POLICE, ARMY, रेल्वे आणि इतर सर्व परीक्षांसह स्पर्धात्मक परीक्षांसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिलेली आहे.
करंट्स अफेयर्स-२०२० शासनाच्या धोरणामधील नवीन अद्यतनांसह, सभ्यता, अर्थव्यवस्था, व्यक्ती आणि बातम्यांमधील ठिकाणे इ.
BY MPSC EXAMS HUB
0 Comments
If You Have Any Doubt, Please Let Me Know