चालू घडामोडी | Current Affairs in Marathi ( प्रश्नसंच) - 2020 | MPSC EXAMS HUB


सराव प्रश्न संच.  :-  उत्तरे आणि स्पष्टीकरणसहित ( By प्रा. अनिल सर)


-----------------------------------------------------------------------------------------
१. नाम ( NAM - NON - ALIGNED MOVEMENT ) बद्दल अचूक विधाने निवडा ?
अ) मार्च १९४७ मध्ये दिल्ली येथे आशियातील स्वतंत्र झालेल्या २८ देशांची परिषद भरविण्यात आली.
ब) या परिषेदेला आफ्रो-आशिया कॉन्फरेन्स म्हणून ओळखले जाते.
क) या परिषदेमध्ये ऐकून ११९ देशांचा समावेश आहे.
ड) नामाचे हे १७ वे शिखर सम्मेलन होते
पर्याय :
A) ,                              B) , ,                     C) ,                        D) वरीलपैकी सर्व

-----------------------------------------------------------------------------------------
स्पष्टीकरण :-  उत्तर :- B) ,        
क)    या परिषदेमध्ये ऐकून १२०  देशांचा समावेश आहे.
आफ्रिका खंड - ५३ , आशिया - ३९ , लॅटिन अमेरिका - २६
     युरोप - २ (बैलारूस , अझरबैजान )
ड) नामाचे हे १८  वे शिखर सम्मेलन होते

-----------------------------------------------------------------------------------------
२. भारताला हॉकी वर्ल्ड कप यजमान पद भूषविण्याची संधी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून कोणत्या वर्षी
     देण्यात आली ?
पर्याय :
A) वर्ष २०२३               B) वर्ष २०२२                C) वर्ष २०२१                D) वर्ष २०२४
-----------------------------------------------------------------------------------------
उत्तर :-  अ ) वर्ष २०२३

-----------------------------------------------------------------------------------------


३. G -20 राष्ट्रीय संसदीय अध्यक्षांची परिषदेची अचूकता दर्शविणारी विधाने खालील पर्याय मधून निवडा?
अ) भारताचे नेतृत्व लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी केले.
ब) या परिषदेला P-20 असे सुद्धा म्हणतात.
क) या परिषदेचे आयोजन जपानमधील टोकियो येथे ३ ते ५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत झाले.
ड) थीम : नावीन्यपूर्ण  भविष्यासाठी आर्थिक वाढ.
पर्याय :
   A) ,,                        B) , ,                     C) ,            D) , , ,

स्पष्टीकरण:- ड) ही थीम BRICS परिषदेची आहे थीम: नावीन्यपूर्ण भविष्यासाठी आर्थिक वाढ.
उत्तर :-  B) , ,   
-----------------------------------------------------------------------------------------
. ब्रिकस शिखर परिषदांच्या योग्य जोडया जुळवा
देश                                     ठिकाण
अ) भारत                     I )           उफा (२०१५)
ब) रशिया                    II )          जोहान्सबर्ग (२०१८)
क) द. आफ्रिका              III )        ब्राझिलिया (२०१९)
ड) ब्राझील                   IV )        नवी दिल्ली (२०१२)
     
          
पर्याय :
A)    अ) – IV), ब) – I), क) – II), ड) – III)

B)     अ) – IV), ब) – III), क) – II), ड) – I)

C)     अ) – I), ब) – IV), क) – II), ड) – III)

D)    अ) – IV), ब) – I), क) – III), ड) – II)

-----------------------------------------------------------------------------------------
उत्तर :- C) अ) – IV), ब) – I), क) – II), ड) – III)

-----------------------------------------------------------------------------------------
. खालीलपैकी योग्य असणारे विधाने निवडा:
अ ) जपानचे नवे सम्राट नारुहीतो यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद
       यांच्यासह जगभरातील नेते उपसथीत होते.

ब) नंदसेना गोटाआया राजपक्षे हे श्रीलंकेच्या अध्यक्षपदी निवडून आले असून ते मैत्रीपाल सिरीसेना  
      यांचे उत्तराधिकारी बनले आहेत.
पर्याय :
A) फक्त अ      
B) फक्त ब      
C) अ आणि ब दोन्ही
D) अ आणि ब दोन्ही नाहीत 
-----------------------------------------------------------------------------------------

उत्तर :- C) अ आणि ब दोन्ही


-----------------------------------------------------------------------------------------

-:42वी घटनादुरुस्ती 1976:-

या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.


I)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.

II) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.

III) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.

IV) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद

V) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती

VI) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.

VII) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.

VIII) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.

IX) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.

X) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.

XI) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण

XII) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.

XIII) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.

XIV) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.

XV) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी

XVI) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.

XVII) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.

XVIII) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद

XIX) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.


अधिक  प्रश्नांसाठी : ब्लॉगस्पॉट : https: //mpscexamshub.blogspot.com
टेलिग्राम चॅनेल :- @mpscexamshub
टेलिग्राम चॅनेल स्टेट बोर्ड पुस्तकासाठी : @bhalbharatiebook

Post a Comment

0 Comments