Current Affairs in Marathi | चालू घडामोडी | MPSC EXAMS HUB



जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचं G7 शिखर संमेलन लांबणीवर; ट्रम्प देणार भारतालाही निमंत्रण.

Current Affairs in Marathi । चालू घडामोडी 
 ( चालू घडामोडी - मार्गदर्शक  By MPSC EXAMS HUB )

This is one of the most important category MPSC / UPSC / COMPETATIVE EXAMS / STATE EXAMS. MPSC EXAM HUB Blogspot has started this new category from which we will be providing you current affairs in marathi on real time basis and updated. 
मित्रांनो चालू घडामोडी ही वर्गवारी खुप महत्वाची आहे आणि MPSC परीक्षांमध्ये चालू घडामोडी या वरती २० ते २५ प्रश्न आधारित असतात. 
त्यामुळे MPSC EXAMS HUB चालू घडामोडी अधिक चांगल्या पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये घेऊन येत आहेत. 

आता मिळवा चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर https://t.me/mpscexamshub या लिंक वर क्लिक करून टेलिग्राम ला जॉईन व्हा.  
G7 - २०२०
   G7 - 2020
अमेरिका, कॅम्प डेव्हिड 

अमेरिकेसह जगभरात थैमान घातलेल्या करोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक महत्वाच्या नियोजित गोष्टी पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. त्यातच ४६ व्या G7 शिखर संमेलनाचाही समावेश झाला आहे. कारण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण ही शिखर परिषद सध्या सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलत असल्याचे शनिवारी माध्यमांशी बोलताना जाहीर केले. कारण जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचं G7 शिखर संमेलन लांबणीवर (COVID19)

गेल्या वर्षी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या संमेलनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले होते. त्याचवेळी ट्रम्प यांनी पुढील वर्षी आम्ही भारताला निमंत्रण देऊ असे जाहीर करीत भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वलयाचे दर्शन घडवले होते. अशा प्रकारे आपण G7 शिखर संमेलन लांबणीवर का पडणार आहे  हे या ब्लॉग  आहोत. 

आपल्या काही शंका  असतील अंतर आपण mpscexamshub@gmail.com यावर पोस्ट करू शकता.   चला आज  आपण जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचं G7 शिखर संमेलन लांबणीवर का आहे सुरु करू. 

कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि अमेरिकेचा गट म्हणजे सातचा गट म्हणजेच G7  होय. जगातील सात मोठ्या प्रगत अर्थव्यवस्थांसह हे देश जागतिक निव्वळ मालमत्तेच्या 62% पेक्षा जास्त (280 ट्रिलियन डॉलर) प्रतिनिधित्व करतात. जी -7  देश नाममात्र मूल्यांच्या आधारे जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 46% पेक्षा जास्त आणि क्रय-शक्ती समतेवर आधारित जागतिक जीडीपीच्या 32% पेक्षा अधिक प्रतिनिधित्त्व करतात. G7 शिखर परिषद देखील युरोपियन संघाचे प्रतिनिधित्व करत असते.

 G7 ही संघटना जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात आघाडीवर असलेल्या अर्थव्यवस्थांच्या देशांची संघटना आहे. यामध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका, युके आणि कॅनडासहित सात देशांचा समावेश आहे. या सर्व देशांचे प्रमुख आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक आणि व्यापार विषयक मुद्द्यांवर दरवर्षी ही बैठक घेऊन चर्चा करतात. या वर्षी G7 बैठकीच्या (संमेलन) आयोजनाची आणि अध्यक्षतेची जबाबदारी अमेरिकेकडे आहे

 46वी, G7 शिखर परिषद 10 जून ते 12 जून 2020 या कालावधीत ग्रुप ऑफ सेव्हनच्या वतीने अमेरिकेच्या कॅम्प डेव्हिड येथे होणार आहे. कोरोनव्हायरस साथीमुळे ही परिषद व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केली जाईल असे सांगितले.

 अमेरिकेसह जगभरात थैमान घातलेल्या करोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक महत्वाच्या नियोजित गोष्टी पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. त्यातच ४६ व्या G7 शिखर संमेलनाचाही समावेश झाला आहे. कारण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण ही शिखर परिषद सध्या सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलत असल्याचे शनिवारी माध्यमांशी बोलताना जाहीर केले.

 विशेष म्हणजे या विशिष्ट देशांच्या गटाच्या संमेलनासाठी ट्रम्प भारतासह ऑस्ट्रेलिया, रशिया आणि दक्षिण कोरियाला देखील आमंत्रित करणार आहेत. या G7 शिखर संमेलनाचे अध्यक्ष दरवर्षी एक किंवा दोन देशांच्या प्रमुखांना विशेष आमंत्रित म्हणून बैठकीसाठी प्रस्ताव पाठवतात. गेल्या वर्षी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या संमेलनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले होते. त्याचवेळी ट्रम्प यांनी पुढील वर्षी आम्ही भारताला निमंत्रण देऊ असे जाहीर करीत भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वलयाचे दर्शन घडवले होते.

 टरम्प म्हणाले, "आपण G7 शिखर संमेलन सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलत आहोत. ही काही देशांची एक जुनी संघटना असली तरी मला वाटत नाही की, G7 संमेलन हे संपूर्ण जगाचं प्रतिनिधीत्व करु शकेल. त्यामुळे जगात सध्या काय घडत आहे हे नेमकं कळू शकणार नाही. त्यामुळे या संमेलनाला आपण भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि दक्षिण कोरिया या देशांनाही निमंत्रित करणार आहोत."

 दरम्यान, व्हाइट हाउसच्या सामरिक संवाद विभागाच्या संचालिका एलिसा एलेक्झेंड्रा फराह म्हणाल्या, "या द्वारे अमेरिका आपल्या पारंपारिक सहकाऱ्यांना सोबत घेणार आहे. कारण चीनच्या भविष्याबाबत चर्चा केली जावी." त्याचबरोबर जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांच्या कार्यालयाकडून शनिवारी सांगण्यात आले की, "त्या या G7 शिखर संमेलनात तोपर्यंत सहभागी होणार नाहीत जोपर्यंत करोना विषाणूचा प्रसार संपत नाही."

G7 शिखर संमेलनात अपेक्षित प्रतिनिधीत्व करणारे देश:-

1.       कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो

2.       फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनचे

3.       जर्मनीचे चांसलर अँजेला मर्केल

4.       इटलीचे पंतप्रधान  ज्युसेप्पे कॉन्टे

5.       जपानचे पंतप्रधान  शिन्झा अबे

6.       युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉनसन

7.       युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

8.       युरोपियन युनियनकडून      कमिशनचे अध्यक्ष उर्सुला लेयन 

                                    कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल


संभाव्य आमंत्रित अतिथी

ऑस्ट्रेलिया, पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, 

भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, 

रशिया, अध्यक्ष व्लादिमीर पुतीन

दक्षिण कोरिया, अध्यक्ष मून जे-इन, 

अध्यक्ष ट्रम्प यांनी हे शिखर किमान सप्टेंबरपर्यंत स्थगित केले.

MPSC EXAMS HUB चालू घडामोडी अधिक चांगल्या पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये घेऊन येत आहेत. 

#46TH_G7_SUMMIT, #COVID19INDIA. #G7SUMMIT2020, #TRUMPAMERIKA, #CAMPDEVIDAMERIKA, #PRIMEMINISTERNARENDRAMODI, #UNIONCOUNCIL, #WORLDG7SUMMIT2020,
#MPSCEXAMSHUB, #MPSCEXAMSHUBBLOG

मित्रांनो चालू घडामोडी ही वर्गवारी खुप महत्वाची आहे आणि MPSC परीक्षांमध्ये चालू घडामोडी या वरती २० ते २५ प्रश्न आधारित असतात. 
त्यामुळे MPSC EXAMS HUB चालू घडामोडी अधिक चांगल्या पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये घेऊन येत आहेत. 

आता मिळवा चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर https://t.me/mpscexamshub या लिंक वर क्लिक करून टेलिग्राम ला जॉईन व्हा.  

Post a Comment

0 Comments