भूगोल | औरंगाबाद जिल्हा | परीक्षाभिमुख आढावा | -2020 | MPSC EXAMS HUB मध्ये जे महत्वाचे मुद्दे आहे ते पाहू आणि विस्तारित माहिती देण्याचा प्रयत्न केला.
तर चला औरंगाबाद जिल्ह्याबद्दल माहित बघूया.
औरंगाबाद जिल्ह्याची माहिती आपण सर्वांनी प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत अभ्यासला असेल परंतु आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी विस्तारित माहिती घ्यावी लागते म्हणून आपण वेगवेगळे जिल्हे पाहणार आहोत.
भूगोल | औरंगाबाद जिल्हा | परीक्षाभिमुख आढावा | -2020 | MPSC EXAMS HUB .
भूगोल | औरंगाबाद जिल्हा | परीक्षाभिमुख आढावा | -2020 | MPSC EXAMS HUB .
⏭औरंगाबाद ज़िल्हा :- (५२ दरवाजांचे शहर)⏮
➤औरंगाबाद परिचय: -
औरंगाबाद हे मराठवाड्यातील महत्वाचा ज़िल्हा असून या जिल्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यालयाचे खंडपीठ, जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या , बीबीका मकबरा , पाणचक्की, थत्तेहौद , दौलताबादचा देवगिरी किल्ला, अजिंठा लेणी, जायकवाडी धरण , पैठण - शालिवाहन राज्याची राजधानी, खाम नदी, गौताळा अभयारण्य , इत्यादी.
➤पूर्वीचे नाव:-
सन १६१० मध्ये निजामशहाचा सरदार मलिक अंबर याने हे शहर खडकी या नावाने स्थापन केले. पुढे मलिक अंबर चा मुलगा फतेह खान याने शहराचे खडकी हे नाव बदलून फतेहनगर असे नामकरण केले
➤इतिहास :-
१६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशाह मुर्तुझा द्वितीय यांचा सरदार मलिक अंबर याने औरंगाबाद शहर वसवले असा इतिहास आहे.
१६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशाह मुर्तुझा द्वितीय यांचा सरदार मलिक अंबर याने औरंगाबाद शहर वसवले असा इतिहास आहे.
सन १६३३ मध्ये मुघलांनी निजामशाहीचा पराभव करून फतेहनगरवर ताबा मिळविला. सन १६५३ मध्ये औरंगजेब फतेहनगरचे औरंगाबाद असे नामकरण करून औरंगाबाद शहराला राजधानी म्हणून घोषित केले.
त्यापैकी काही दरवाजे सध्या अस्तित्वात असून काही दरवाजे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी १४ नहरी बांधल्या त्यातील दोन नहरी अजून चालू आहेत.
औरंगजेब त्याच्या मृत्युपर्यंत औरंगाबाद येथेच राहिला. औरंगजेबाच्या मृत्युनंतर औरंगाबाद शहर, हैदराबाद निजामाच्या राजवटीत सामिल झाले.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद हे निजामाकडून मुक्त झाले. १ नोव्हेंबर १९५६ रोजी औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाडा हा विभाग हैदराबाद राज्यातुन तत्कालीन बॉम्बे राज्यात विलीन झाले.
➤एकूण तालुका:-
औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री , वैजापूर, सिल्लोड, सोयगाव
➤औरंगाबाद जिल्ह्याचे स्थान व विस्तार : -
औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला जळगाव जिल्हा आहे. तसेच पूर्वेला जालना जिल्हा असून दक्षिणेला बीड व नगर जिल्हा तसेच पश्चिमेला नाशिक हा जिल्हा आहे.
भौगोलिकदृष्ट्या संपूर्ण भाग लाव्हा पासून बनलेला आहे. दख्खन पठार हा बेसल्टिक लावा पासून एकमेव ही मोठी भौगोलिक निर्मिती आहे.
➤एकूण भौगोलिक क्षेत्रफळ:-१०,१३०.८९ चौ. कि.मी
➤भौगोलिक दृष्टया :-
दक्षिणेकडील भागाची सरासरी उंची ६००-६६० मीटर आहे. उत्तरेडकडून दक्षिणेकडे असा जमिनीचा उतार आढळुन येतो.
दक्षिणेकडील भागाची सरासरी उंची ६००-६६० मीटर आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाळी हंगाम जून ते सप्टेंबर दरम्यान असतो.
हिवाळा साधारणतः ऑक्टोबर ते फेब्रुवारी
उन्हाळा मार्च ते मे दरम्यान असतो.
औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी ७२५.८ मिमी पाऊस पडतो
तापमान श्रेणी ६ ते ४६ डिग्री सेल्सिअस असते.
➤पर्वत:-
अंतूर -८२७ मी,
सतोंडा - ५५२मी,
अब्बासगड -६७१ मीटर,
अजिंठा ५७८ मीटर
➤लोकसंख्या :- ३७.०१ लाख (२०११ जनगणना)
जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ४३.८% (लोकसंख्या शहरी ) व ४५.२% (लोकसंख्या ग्रामीण)
पुरुष:महिला प्रमाण:- १०००:९२३
तर राज्याचे पुरुष:महिला प्रमाण:- १०००:९२९
जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण:- ७९%
पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण :-८७.४%
महिलांचे साक्षरतेचे प्रमाण :-७०.१%
➤प्रमुख मार्ग : NH -२११
➤जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:-
१. अजंठा - वेरूळ लेण्या : ५ व्या - ८ व्या शतकात गुफेत साकारलेल्या लेण्या
२. दौलताबाद किल्ला : मोहम्मद तुघलकाची राजधानी
३. खुलताबाद : मुघल बादशहा औरंगजेबाची कबर
४. बीबी का मकबरा:- हे १६६० मध्ये औरंगजेबचा मुलगा आझम शहा यांनी आपल्या आईची [ बेगम राबीयाची(बादशहा औरंगजेबाच्या पत्नीची)] आठवण म्हणून बांधलेले कबर आहे.
५. घृष्णेश्वर मंदीर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक (बारावे ज्योतिर्लिंग)
६. पाणचक्की:-
७. पैठण : संत एकनाथ यांचे गाव
८. जायकवाडी धरण : नाथसागर ( जायकवाडी धरण पक्षी अभयारण्य )
९. औरंगाबाद गुफा आणि औरंगाबाद लेणी:-( युनेस्कोने इ.स १९८३ साली जागतिक वारसा घोषित)
१०. म्हैसमाळ - थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद येथे आहे.
जून २०१३ मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्याची घोषणा केली.
➤थंड हवेचे ठिकाण :- म्हैसमाळ
➤उद्योग :-
औरंगाबाद तालुक्यात वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा या ठिकाणी तसेच पैठण तालुक्यात औद्योगिक वसाहती आहेत. शेंद्रा औद्योगिक वसाहत हि पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. चिकलठाणा येथे एक आय.टी. पार्क आहे.
➤प्रमुख पीके:- कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू
➤पैठण:-
पैठण हे शहर महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असून पूर्वी शालीवाहन राजाची राजधानी म्हणून यांस महत्व होते.
राजा रामदेवराय यादवांच्या काळात पैठणला धार्मिक महत्व प्राप्त झालं. दक्षिण काशी म्हणून पैठणला ओळखलं जाऊ लागलं.
इ.स. १३१२ च्या सुमारास यादवांचं राज्य संपुष्टात येऊन पैठण मोगलांच्या ताब्यात गेलं.
स्वातंत्रोत्तर काळापर्यंत पैठण निजामांच्या अधिकार क्षेत्रात होतं.
पैठणने जगास अनेक नररत्ने दिली:-
शून्याचा शोध लावणारे गणितज्ञ भास्कराचार्य,
संत भानुदास, संत एकनाथ,
कवी मुक्तेश्वर,
संत गावोबा,
निर्णयसिंधुकार भट्टोजी दीक्षित,
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट,
गानकलेत निष्णात असणारे नाथवंशीय रामचंद्रबुवा,
मय्याबुवा, छ्य्याबुवा, काशिनाथबुवा त्याचप्रमाणे,
राजकीय क्षेत्रातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भारताचे माजी गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण आदींचा त्यात समावेश होतो.
अश्या प्रकारे आपण औरंगाबाद हे मराठवाड्यातील महत्वाचा ज़िल्हा असून या जिल्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यालयाचे खंडपीठ, जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या , बीबीका मकबरा , पाणचक्की, थत्तेहौद , दौलताबादचा देवगिरी किल्ला, अजिंठा लेणी, जायकवाडी धरण , पैठण - शालिवाहन राज्याची राजधानी, खाम नदी, गौताळा अभयारण्य , इत्यादी. बद्दल माहित घेतली अशी माहिती आपण घेऊन नवीन जिल्हा नवींन माहिती घेऊन येऊ.
@mpsc exmas hub
#GEOGRAPHY
#GEOGRAPHY
#MPSC | #STI | #ASO | #PSI -2020
#AURANGABAD DISTRICT
Join Telegram



0 Comments
If You Have Any Doubt, Please Let Me Know