जीवशास्त्र : मानवी पचनसंस्था । एमपीएससी-२०२० । विज्ञान । MPSC EXAMS HUB

मानवी शरीरात अन्न पचनासाठी विविध अवयव मिळून पचनसंस्था तयार झालेली आहे. खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.
पचन संस्थेमध्ये अन्ननलिका (Alimentary Canal) व पाचकग्रंथी (Digestive Glands) यांचा समावेश होतो.
अन्ननलिका एक लांब, स्नायुमय नलिका असून ती मुखापासून गुदद्वारापर्यंत असते.
अन्ननलिकेची लांबी 9 meter  असते.
मानवी शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अन्ननलिकेचा व्यास वेगवेगळा असतो.


अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील भागांचा समावेश होतो.

मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)
ग्रसनी (Pharynx)
ग्रसिका (Esophagus)
जठर/ आमाशय (Stomach)
लहान आतडे (Small Intestine)
मोठे आतडे (Large Intestine)
मलाशय (Rectum) 
गुदद्वार (Anus) यांचा समावेश होतो.

जीवशास्त्रामध्ये मानवी पचनसंस्था फार महत्वाची संस्था आहे( एमपीएससी-२०२० । विज्ञान ) ज्यामध्ये पुढीलप्रमाणे घटक येतात. 

लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात.

पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात.

अन्नपचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पचनेंद्रिये वेगळे आहे आणि विशिष्ट टप्प्यावरील ती ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात.

जीवशास्त्र : मानवी पचनसंस्था । एमपीएससी-२०२० । विज्ञान । MPSC  EXAMS  HUB


पचनसंस्था :-

प्राण्याच्या शरीरातली पचनसंस्था ही त्याच्या शरीरातील अनेक अवयवांची बनलेली आहे. या संस्थेमुळे खाल्लेल्या अन्नाचे पोषकद्रव्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला पचन असे म्हणतात. ही पोषकद्रव्ये शरीराची वाढ व चलनवलन यांसाठी उपयोगी पडतात.

माणसाच्या पचनसंस्थेत पुढील अवयव असतात:

तोंड, घसा, अन्ननलिका, जठर, स्वादुपिंड, यकृत, पित्ताशय, लहान आतडे, मोठे आतडे, गुदाशय व गुदद्वार.

१) तोंड:-

तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. यात आपल्या ओठ,दात, जीभ, लाळग्रंथीचे छिद्र यांचा समावेश होतो.

आजार:-

तोंडाच्या आतील श्लेष्मल त्वचेला येणारी सूज म्हणजेच स्टोमॅटिटिस अर्थात ‘तोंड येणं.’ कारणांनुसार याची लक्षणं वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतात.

अतितीव्र आम्ल, अल्कली किवा औषधांचा संपर्क तोडांतील त्वचेशी आल्यास. व्हिटॅमिन ‘बी’ची कमतरतेमुळे.

२)घसा:-

घसा हा मानवी शरीराचा एक भाग आहे.

३) अन्ननलिका:-


अन्ननलिका ही एक स्नायुयुक्त नलिका असते जी घसा ते जठराचे वरचे मुख यांना जोडते. नलिकेतून अन्न स्नायुंच्या हलचालींच्या साहाय्याने पुढे ढकलले जाते.

तिची लांबी २०-२५ से.मी. पर्यंत असते. अन्ननलिकेची आतील बाजूस स्तरीकृत स्क्वैमस उपकला (Stetified Squamous Epithelium) असते.

४) जठर:-

जठर मानवी पचनसंस्थेतील एक अवयव आहे. जठरातून आम्लयुक्त (acidic) जाठररस स्त्रवतो. त्यामुळे अन्नाचे पचन होते. अन्नाचे पचन, शोषण व रोगजंतूंचा नायनाट करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे अ‍ॅसिड करत असते.

जठर विकार:-

जाठररसाचे प्रमाणे वाढले की, मग मात्र त्याच्या उपयुक्ततेपेक्षा त्याच्या दाहकतेचा त्रास होतो. यालाच आम्लपित्त असेही म्हणतात.

या आम्लपात्ति छातीत पोटात जळजळ, पोटदुखी, अपचन, डोकेदुखी, उलट्या, पित्त उसळी मारून तोंडात येणे, आंबट करपट चव, तोंडास दुर्गंधी, अस्वस्थता अशा स्वरूपात आढळतात. कालांतराने या लक्षणांचे रूपांतर पोटात अल्सर रक्तस्राव यात होऊ शकते.

५) स्वादुपिंड:-

स्वादुपिंड किंवा अग्न्याशय हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या पचनसंस्थेतील एक अवयव आहे. स्वादुपिंड ही एक संयुक्त ग्रंथी असून यातून पाचक विकरांचा विसर्ग होतो, तसेच इन्शुलिन, ग्लुकागॉन, VIP, सोमॅटोस्टॅटिन इत्यादी संप्रेरके स्रवतात. हे स्राव कर्बोदकांच्या (शर्करा) चयापचयामध्ये अत्यावश्यक असतात.

मानवाचे स्वादुपिंड अंदाजे ८० ग्रॅम वजनाचे आणि नाशपातीच्या आकाराचे असते.


प्रौढांमध्ये स्वादुपिंडाचे कार्य मुख्यत्वे स्वादुनलिकेतून ग्रहणीमध्ये विकरे स्रवणे एवढेच असते. स्वादुपिंडाच्या द्राक्षासारख्या दिसणाऱ्या पेशीपुंजांत स्वादुरस नावाचा पाचक रस निर्माण होतो. या पेशींना स्वादुपेशी असे म्हणतात.


स्वादुपिंड (Pancreas) शरीरातील मिश्रित ग्रंथी असून ती पोटामध्ये वरच्या भागात डाव्या बाजूला जठरच्या पाठीमागे असते. स्वादुपिंडाचे हेड, नेक, बॉडी व टेल असे असे चार भागात विभाजन केले जाते. तसेच, पॅनक्रियाटीक duct द्वारे डीओडेनम या छोट्या आतडयाला जोडलेले असते. त्याद्वारे अन्नपचनासाठी आवश्यक एन्झाईम्स स्वादुपिंडामध्ये बनवून पाठवली जातात. स्वादुपिंडाचे दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे इन्सुलिन, ग्लूक्यागोण, सोम्याटोस्टयाटीन इत्यादी होर्मोन्स बनवली जातात व त्याद्वारे मुख्यतः साखरेचे प्रमाण नियंत्रित केले जाते.

६)यकृत:

प्रौढ अशा मानवाचे यकृत हे १.३ ते ३.० कि.ग्रॅ. इतक्या वजनाचे असते. हे नरम व गुलाबी करडया रंगाचे असते. हे मानवाच्या शरीरातील दुसऱ्या क्रमांकाचे अवयव व सर्वात मोठी ग्रंथी आहे. हे अवयव उदराच्या वरच्या बाजुस बरगड्यांच्या खाली स्थित असते. यकृताला दोन भाग असतात.

उजवा भाग (Right lobe)- हा डाव्या भागापेक्षा मोठा असतो.
डावा भाग (left lobe)

कार्ये:-


  • पचनसंस्थेतील यकृत व पित्ताशय
  • शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे, जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे अशी कामे यकृत पार पाडते.
  • तसेच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे.
  • शरीरातील सुमारे 7% लोह यकृतात साठवलेले असते.
  • यकृता मध्ये सहा महिने पुरेल एवढा 'अ' जीवनसत्व चा साठा असतो
  • आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे.
  • निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासुन बिलिरुबिन ची निर्मीती करणे.
  • तसेच पित्त रस तयार करून त्या व्दारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे.
  • आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं.

आजार:-

सिरॉसिस म्हणजेच यकृत -हास. हा यकृताचा एक गंभीर आजार असून यात यकृताचे कार्य सुरळीत पार पाडणाऱ्या महत्त्वाच्या पेशींची हानी होते. यालाच यकृताचे कार्य बंद पडणे किंवा ‘लिव्हर फेल्युअर’ असे म्हणतात.

सांसर्गिक हेपेटाइटिस- व्हायरल सांसर्गिक हेपेटाइटिसचे काही प्रकार आहेत.यात विषाणू बाधा होते.


व्हायरल हेपेटाइटिस- अ


व्हायरल हेपेटाइटिस- ब


व्हायरल हेपेटाइटिस- क


व्हायरल हेपेटाइटिस- इ

अमिबामुळे होणारा यकृतातील गंड

७) पित्ताशय:- (आजार :-कावीळ)

पित्ताशय हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या उदरपोकळीतला, अन्नाच्या पचनास मदत करणारा महत्त्वाचा अवयव आहे. यकृताने निर्मिलेले पित्तरस यात साठवले जाते.


पित्ताशयाचे आजार:-

पित्ताशयातील बिलिरुबिन व कॅल्शियमयुक्त खडे

पित्ताशयातील कॉलेस्टेरॉलयुक्त खडे

पित्ताशयातील खडे- पित्ताशयाच्या पिशवीसारख्या भागात पित्तरसातील पाणी कमी केले जाते, त्यावेळी काही रसायनांचे खडे तयार होतात. हे कॉलेस्टेरॉल किंवा बिलिरुबिन व कॅल्शियमचे खडे तयार होतात.

पित्ताशयाला सुज- पित्ताशयाला जंतुसंसर्गामुळे सुज येते.

पित्ताशयातील पॉलीप

८) लहान आतडे:

लहान आतडे हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या पचनसंस्थेतील एक अवयव आहे. पचनमार्गात जठरानंतर व मोठ्या आतड्याआधी येणाऱ्या या अवयवात पचनाचे व अन्नरस शोषण्याचे कार्य होते.

आकार:-
लहान आतड्याची लांबी सुमारे ६ मी. असते व ते पोटाच्या पोकळीत मध्यभागी वेटोळे करून असते. या पोकळ नळीचा व्यास सुरूवातीस सुमारे ५ सें.मी. असून तो कमी होत शेवटी ३.५ सें.मी. होतो.

लहान आतड्याचे भाग:-
लहान आतड्याचे आद्यांत्र, मध्यांत्र व शेषांत्र असे तीन भाग आहेत.

आद्यांत्र (Duodenum):- या लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाची लांबी सुमारे २५ सें.मी. असते. याचा आकार रोमन लिपीतल्या सी (C) अक्षरासारखा असून ते स्वादुपिंडाभोवती असते. पित्ताशय व स्वादुपिंडातील स्राव त्यांच्या नलिकांद्वारे आद्यांत्रात सोडले जातात.


मध्यांत्र (Jejunum) :- या मधल्या भागाची लांबी सुमारे २.५० मी. असते.


शेषांत्र (Ilium):- हा शेवटचा भाग सुमारे ३.२५ मी. लांब असतो.


कार्ये:-

अन्नाचे पचन व अन्नघटकांचे शोषण हे लहान आतड्याचे मुख्य कार्य होय. या ग्रंथीत निर्माण होणारे स्राव जठराकडून आलेल्या अन्नाबरोबर मिसळतात. स्रावातील विकरांमार्फत (एंझाइमांमार्फत) वेगवेगळ्या अन्नघटकांचे त्यांच्या मूल घटकांमध्ये रूपांतर होते व या मूल घटकांचे लहान आतड्यातील पेशींमार्फत शोषण होते. लहान आतडे हा महत्वाचा भाग आहे.

लहान आतड्यातील स्रावांमुळे प्रथिनांचे विघटन अ‍ॅमिनो आम्लांत, कर्बोदकांचे साध्या शर्करेत (ग्लुकोज) व मेद घटकांचे मेदाम्लांत रूपांतर होते. दिवसभरात साधारणपणे दीड लीटर स्राव लहान आतडे, यकृत व स्वादुपिंड यांमध्ये तयार होऊन तो लहान आतड्यात अन्नपचनासाठी सोडला जातो.

९) मोठे आतडे :-

मानवी शरीराचा एक अवयव आहे. आतडे हा अवयव अन्नाचे पचन करण्यास मदत करतो. यांची लांबी १ ते १.५ मी. असते


कार्य:- पाणी शोषन,तात्पुरता मलसंचयन आणि मलोत्सरण करणे.

१०) गुदद्वार:-

"गुदद्वार" हे शरीराच्या भागातील बाहेरच्या बाजूकडील हे मलद्वार आहे.

रचना:-

मानवी गुदद्वार हे दोघी नितंबाच्या मध्यभागी असते. प्राण्यांचे गुदद्वार हे पिशवी सारखे असते.

Post a Comment

0 Comments