GEOGRAPHY 18 APRIL-2020
पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो. उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.
विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.
अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात.
अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त
दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश
उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश
मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात.
विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.
१. एक प्रकशवर्ष म्हणजे सुमारे __________ खगोलीय एकके इतके अंतर होय?
६३,२४०
२. सूर्याच्या भोवती फिरणाऱ्या वस्तू या सिद्धांताप्रमाणे फिरतात हे खालील पर्यायातून ओळखा ?
केप्लर
३.सूर्यमालेची निर्मिती ही या सिद्धांताप्रमाणे झाली आल्याचे खगोल शास्त्रज्ञ मानतात?
तेजोमेघ
४. सूर्य दर सेकंदाला _________ कोटी टन हायड्रोजन अणुइंधन वापरतो?
४
५. सूर्याचा पृष्ठ भाग हा खालीलपैकी कोणत्या घटकांपासून बनला आहे?
वरीलपैकी सर्व
६. पृथ्वी तिच्या स्वत:भोवती फिरण्याच्या आसापासुन _____ अंशांनी केललेली आहे?
२३.५
७. पृथ्वीचे एका अक्षांशाचे अंतर किती कि.मी. आहे ?
११०.५६८ किमी.
८. भूकवचातील काही मूलद्रव्यांचे शेकडा प्रमाण खाली दिलेले आहे त्यामधून सर्वात जास्त मूलद्रवांचे प्रमाण निवडा?
ऑक्सिजन
९. पृथ्वीचे विषुववृत्तावर एका रेखांशाचे अंतर किती कि.मी. आहे ?
१११.३२
पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारण्यासलागणारा काळ (दिवस) खालील पर्यायातून ओळखा?
२३ ता. ५६ मि. ४.०९१ से.
0 Comments
If You Have Any Doubt, Please Let Me Know