एमपीएससी | अमरावती जिल्हा । परीक्षाभिमुख माहिती | 2020 | MPSC EXAMS HUB

अमरावती जिल्हा २०° ३२आणि २१° ४६उत्तर अक्षांश आणि ७६° ३७ आणि ७८° २७पूर्व रेखांश दरम्यान स्थित आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १२,२३५ वर्ग कि.मी. आहे. अमरावती जिल्हाच्या उत्तरेस मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्हा व ईशान्य दिक्षेस नागपूर जिल्हाआग्नेश वर्धा जिल्हा आहे ,  दक्षिणेस यवतमाळ, नैर्ऋत्यला वाशिम पश्चिमेस अकोला व बुलढाणा जिल्हा आहे . 


एमपीएससी | अमरावती  जिल्हा । परीक्षाभिमुख माहिती | 2020   साठी आपण महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यामधील माहिती पाहणार आहोत.   यामध्ये सर्व जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील सर्व माहिती एकत्रित  झाली आपल्याला  महाराष्ट्राचा बेसिक भूगोल आणि त्यानंतर भारताचा भूगोल समजण्यास सोपा होईल.

एमपीएससी । अमरावती  जिल्हा । #MPSC । #STI  । #ASO । #PSI -२०२० साठी आपण जे महत्वाचे मुद्दे आहे ते पाहू आणि विस्तारित माहितीसाठी काही आणखी माहिती असेल तर कंमेंट करा.


अमरावती जिल्ह्याची माहिती आपण सर्वांनी प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत अभ्यासला असेल परंतु आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी विस्तारित माहिती घ्यावी लागते म्हणून आपण वेगवेगळे जिल्हे पाहणार आहोत.

-:अमरावती जिल्हा:- 

अमरावती जिल्हा हा मध्य भारतातील महाराष्ट्र राज्याचा एक जिल्हा आहे. अमरावती हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

अमरावती नाव का पडले?
अमरावती जिल्हयाचे मूळनाव उमरावती होते कारण तेथे उंबराचे झाडे खूप होते.
तसेच त्या जिल्ह्याला इंद्राची नगरी असे ही म्हणतात. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून म्हणून अमरावतीला ओळखले जाते. विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ही अमरावतीला ओळखले जाते. 

१९०३ मध्ये वऱ्हाड  हा मध्यप्रांताला जोडण्यात आला (लॉर्ड कर्झन)द्वारे 
१९६४ मध्येअमरावतीमधून यवतमाळ जिल्हा वेगळा करण्यात आला. 

अमरावती हे दाट लोकवस्ती असलेल्या महानगर क्षेत्रांमध्ये ७ व्या  क्रमांकावर येते. शहरात ऐतिहासिक अशी अंबा  व श्रीकृष्ण मंदिरे आहेत.  १९८३ मध्ये स्थापन अमरावती  महानगरपालिका झाली. ही  'खाजगी जकात ' म्हणून ओळखली जाणारी भारतातील पहिली महानगरपालिका आहे. 

लोकसंख्या :- ६,४६,८०१ (२०११) नुसार 


स्थान व विस्तार : - 

अमरावती जिल्हा २०° ३२आणि २१° ४६उत्तर अक्षांश आणि ७६° ३७ आणि ७८° २७पूर्व रेखांश दरम्यान स्थित आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १२,२३५ वर्ग कि.मी. आहे. अमरावती जिल्हाच्या उत्तरेस मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्हा व ईशान्य दिक्षेस नागपूर जिल्हाआग्नेश वर्धा जिल्हा आहे ,  दक्षिणेस यवतमाळ, नैर्ऋत्यला वाशिम पश्चिमेस अकोला व बुलढाणा जिल्हा आहे . 

क्षारता दर : ८८.२३%

तालुके : १४ 

अचलपूर, अंजनगाव सुर्जी, अमरावती,
चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा,
तिवसा, दर्यापूरधामणगाव रेल्वे,
धारणी, नांदगाव -खांडेश्वर,भातकुली,
मोर्शीवरुड 

नागपुर शहरापासुन अंतर १५२  कि.मी. आणि मुंबईपासुन अंतर ६६३ कि.मी.
     राष्ट्रीय महामार्ग ६ हा बडने.यातुन गेला आहे . 
     अमरावती १५ कि.मी. आहे


भातकुले  येथील जैन मंदिरे प्रसिद्ध आहेत. -पोहरादेवी अभयारण्य पाहण्यासारखे आहे. 
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (अमरावती विद्यापीठ)

श्री शिवाजी पटवर्धन यांनी स्थापण केलेले "तपोवनहे कुष्ठरोग्यांसाठीचा प्रकल्प शहराच्या पूर्वेला आहे.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे आहे. 

चिखलदऱ्याजवळची काही आकर्षण केंद्रे :
मेळघाट व्याघ्रप्रकल्पकोलखास आणि सेमाडोह हे निसर्गरम्य स्थळे.
गाविलगड किल्ला.
नर्नाळा किल्ला.
पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन
ट्रायबल म्युझियम

अमरावती शहरात आणखी काही पर्यटन व प्रेक्षणीय स्थळे खालीलप्रमाणे :

अंबादेवी मंदिर,अमरावती
एकविरा देवी मंदिर
बांबू उद्यान अमरावती
श्री क्षेत्र कोंडेश्वर अमरावती
छत्री तलाव
वडाळी तलाव
अमरावती जिल्हयातील महत्वपुर्ण व्यक्तीमत्व :- 
     संत गाडगे महाराज
     राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
प्रतिभाताई पाटील (पहिले राष्ट्रपती)

थंड हवेचे ठिकाण :-

चिखलदरा  हे  थंड हवेचे ठिकाण व मेळघाट अमरावती जिल्ह्यात आहे.

वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.

अप्पर वर्धा धरण  (नल -दमयंती सागर) हे सुद्धा अमरावती जिल्ह्यात आहे.

अमरावती जिल्हा हा पूर्णपणे दख्खच्या पठारावर आहे. 
१९०३ मध्ये वऱ्हाड  हा मध्यप्रांताला जोडण्यात आला (लॉर्ड कर्झन)द्वारे

शेती :-

अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक कापूसतापी व वर्धा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत.
अमरावती जिल्ह्यामध्ये रेगूर ही काळी मृदा मोठ्या प्रमाणात आहेजिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. 
अमरावती जिल्ह्यातील इतर काही नद्या त्यांच्या उपनद्यांबरोबर खाली दिल्या आहेत.

बुर्शी नदीसुखी नदीटिग्रीया नदीखंडू नदीखाप्रा नदीसांगिया नदीगाडागा नदीवान नदी
वर्धा नदीविदर्भ नदीबोर नदीपाक नालामारू नदीनरहा नदीचार्गर नदीशहानूर नदी 

अशा प्रकारे आपण अमरावती जिल्ह्यातील महत्वाचे पिके , थंड हवेचे ठिकाण , सर्वात उंच ठिकाण, स्थान व विस्तार , महत्वाची व्यक्ती, प्रमुखा नद्या, यवतमाळ जिल्हा कधी निर्माण झाला, लॉर्ड कर्झन , आणि इतर महत्वाच्या घडामोड तसेच प्रमख तालुके. अशाच प्रकारे पुढील ज़िल्हा व त्याबद्दल माहिती घेऊ येऊ, तोयपर्यंत... पुढच्या विषयाचा अभ्यास करा. 

#AmarvatiDist 
@MPSC EXAMS HUB

एमपीएससी | अमरावती  जिल्हा । परीक्षाभिमुख माहिती | 2020 | MPSC EXAMS HUB 

#Thank You 

Post a Comment

0 Comments